१२
अनुकंपा नियुक्त्या · दोन वर्षांत संस्थेत राज्यात सर्वाधिक
परिचय पत्र
Ph.D. (Pursuing), SET, M.A. (Political Science)
ही लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक नाही. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे — मतदार शिक्षक आहेत.

प्रा. सचिन नवनाथ सानप
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ
महाराष्ट्र विधानपरिषद · डिसेंबर २०२६
तिहेरी भूमिका
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या सुकाणू समितीपासून अंमलबजावणीपर्यंत — प्राध्यापक, शैक्षणिक संस्थेचा विश्वस्त आणि विशेष कार्य अधिकारी या तिहेरी भूमिकेतून शिक्षकांचे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्नांचे सखोल आकलन.
दस्तऐवजी काम
१२
अनुकंपा नियुक्त्या · दोन वर्षांत संस्थेत राज्यात सर्वाधिक
३
महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा
१०
वर्षे मोफत वसतिगृह · एकलव्य, पुणे
AGP
६–७ व ७–८ चा लाभ शिक्षकांना
विविध क्षेत्रातील कामगिरी
विश्वस्त म्हणून केलेले कार्य
मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे — शिक्षकांच्या वेतन, पदोन्नती, आरोग्य आणि संशोधन हक्कांसाठी संस्था पातळीवर केलेले काम.
तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या/प्राध्यापकांच्या वेतनात वाढ करून त्यांना वेळेवर वेतन मिळण्याची व्यवस्था केली. तसेच प्रवेश प्रक्रिया किंवा इतर अधिकच्या कामातील सहभागासाठी स्वतंत्र मानधन देण्याची तरतूद केली.
वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पद भरतीसाठी शासन स्तरावर यशस्वी पाठपुरावा केला.
संस्थेअंतर्गत पारदर्शक पद्धतीने कालबद्ध पदोन्नती व कार्यमूल्यांकन योजना राबवून ६ ते ७ आणि ७ ते ८ AGP चा लाभ शिक्षकांना मिळवून दिला.
शिक्षकांची प्रलंबित वेतनश्रेणी व पगारवाढीची प्रकरणे तातडीने निकाली काढून संबंधित शिक्षकांना लाभ मिळवून दिला.
दिवंगत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर तातडीने नियुक्त्या देण्यात आल्या. मागील २ वर्षांमध्ये संस्थेअंतर्गत राज्यात सर्वाधिक १२ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्त्या देण्यात आल्या.
SIR व तत्सम अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांना दिलासा मिळण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा आणि प्रसंगी संघर्ष केला.
संस्थेच्या विनाअनुदानित विभागात कार्यरत कंत्राटी व नियमित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस आरोग्य विमा योजना प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलसोबत सामंजस्य करार करून सुरू केली.
संस्थेतील शिक्षकांना Faculty Development Programme (FDP), Refresher Course आणि Orientation Programme इत्यादी उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन आणि मोफत सहभागाची संधी उपलब्ध करून दिली.
संस्था पातळीवर संशोधन प्रकल्प, पेटंट, पुस्तके, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे व शोधनिबंध परिषदांसाठी पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला.
शिक्षकांच्या सूचनांना निर्णय प्रक्रियेत स्थान देण्यासाठी बैठकांच्या माध्यमातून कर्मचारी व विद्यार्थ्यांशी नियमित संवाद साधला.
संस्थेत तक्रार निवारण समिती प्रभावीपणे कार्यान्वित केली; तसेच विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित कार्यस्थळ आणि POSH समितीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
शिक्षकांचे योगदान आणि कार्याची दखल घेऊन प्रोत्साहनासाठी विविध पुरस्कार व विशेष गौरव उपक्रम सुरू केले.
बदलत्या काळानुसार आधुनिक अध्यापन पद्धतीचा विकास करण्यासाठी स्मार्ट क्लासरूम, डिजिटल लॅब, ई-लर्निंग साधने उपलब्ध करून दिली.
शासन प्रशासनाच्या स्तरावर केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे संस्थेअंतर्गत तीन महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा प्राप्त झाला.
विद्यापीठ शिक्षक मान्यता (Teaching Approval) कालबद्ध करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला.
माझा संकल्प
हे घोषणा नाहीत. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर घेतलेली भूमिका आहे — शासकीय पाठपुरावा, आणि जिथे गरज असेल तिथे न्यायालयीन लढा.
टप्प्याची प्रतीक्षा नव्हे — कालबद्ध पूर्ण अनुदानाचा हक्क.
जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्यासाठी प्रयत्न करणार.
२ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी रुजू झालेल्या विनाअनुदानित, अंशतः अनुदानित तत्त्वावरील शिक्षक सेवेमध्ये रुजू झालेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी शर्थीने प्रयत्न करणार व प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढणार.
“टप्प्याची प्रतीक्षा नव्हे—कालबद्ध पूर्ण अनुदानाचा हक्क!” ही भूमिका घेऊन अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य आणि सेवासुरक्षा मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जातील.
“समान काम—समान सेवा हक्क—न्याय्य वेतन व लाभ!” या भूमिकेतून तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण, व कौशल्य शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक पात्र शिक्षकांच्या सेवा व आर्थिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहून सातत्यपूर्ण प्रयत्न करणार.
शिक्षकांच्या वेतनातील विलंब, थकीत वेतन देयके व सातव्या वेतन आयोगाशी संबंधित देयके तातडीने अदा / पारीत करून दर महिन्याच्या १ तारखेला शिक्षकांच्या बँक खात्यावर वेतन जमा करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार.
निवडणूक, जनगणना, सर्वेक्षण इत्यादी अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची कायमची मुक्तता करण्यासाठी शासनास प्रवृत्त करणार आणि प्रसंगी न्यायालयीन लढा देणार.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, तंत्रशिक्षण, अभियांत्रिकी आणि वरिष्ठ महाविद्यालयांमधील ग्रंथपाल, शिक्षक, क्रीडा शिक्षक व विशेष विषय शिक्षकांच्या रिक्त पदांची तातडीने भरती करण्यासाठी प्रयत्नशील राहणार.
शिक्षकांचा कार्यभार जोपर्यंत शून्य होत नाही तोपर्यंत त्यांना अतिरिक्त (Surplus) शिक्षक म्हणून घोषित करू देणार नाही.
स्वयंअर्थसहाय्य तत्त्व रद्द करून सरसकट सर्वच शाळांना अनुदानित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार.
शिक्षण सेवक योजना कायमची बंद करून विद्यमान शिक्षण सेवकांनाही तातडीने पूर्ण सेवा संरक्षण देण्यासाठी पाठपुरावा करणार.
शिक्षकांना १०/२०/३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना आणि सरसकट निवड वेतनश्रेणी लागू करण्यासाठी पाठपुरावा करणार.
मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व इतर पदोन्नतीतील अडथळे दूर करून शिक्षकांना TET/CTET सक्तीमधून दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार व प्रसंगी न्यायालयीन लढा देणार.
शालार्थ व सेवाविषयक बाबी सुलभ करणे — तांत्रिक त्रुटींमुळे वेतन व सेवा नोंदींमध्ये होणारा विलंब कमी करणे; बदली, मान्यता, वरिष्ठता, सेवा पुस्तिका व पदोन्नतीतील प्रलंबित प्रस्ताव निकाली काढणे.
माध्यम स्वातंत्र्य — सर्वच अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार इंग्रजी अथवा मराठी माध्यम स्वीकारण्याची सोय उपलब्ध करून देवून अशा शाळांमधील शिक्षकांना अनुदान घोषित करणे.
सर्व अध्यापक व शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा सुविधा लागू करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार.
कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर विज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक बॅचची संख्या २० एवढीच ग्राह्य धरून व ४५ मिनिटांच्या तासिका ग्राह्य धरूनच प्रचलित पद्धतीने संच मान्यता कायम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार व याबाबत नुकतीच मी स्वत: न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
अकृषी विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यमान पदभरती गतिमान व पारदर्शक करण्यासाठी पाठपुरावा करणार.
राज्यातील कृषी विद्यापीठांमधील अध्यापकांची रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवून पारदर्शक व गतिमान करण्यासाठी शासनास प्रवृत्त करणार.
वरिष्ठ महाविद्यालयांप्रमाणे सर्वच शिक्षकांना सेवानिवृत्तीचे वय ५८ वरुन ६० वर्षे करण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करणार.
संपर्क
दूरध्वनी
९१६८४९९०९०पत्ता
जानकी इमारत, बीएसएनएल कार्यालयाच्या समोर, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे- ०४
नकाशा उघडा